संभाजी सेना वर्धापन दिन व दिनदर्शिका प्रकाशन समारंभ उत्साहात

WhatsApp Image 2020 01 11 at 6.17.39 PM

चाळीसगाव, प्रतिनिधी | येथे संभाजी सेनेचा ८ वा वर्धापन दिवस व जिजाऊ जयंती संभाजी सेना चाळीसगाव शाखेतर्फे उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील व मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांना माल्यार्पण करून जिजाऊ पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी संभाजी सेना दिनदर्शिकेचे प्रकाशन उपस्थित सर्व जिजाऊंच्या लेकींच्‍या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी सभेच्या प्रदेश विधी सल्लागार एडवोकेट आशा शिरसाठ यांनी केले. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोरपडे यांनी संभाजी सेनेच्या कार्याचा आढावा घेताना संभाजी सेना सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी मराठा आरक्षणाचा विषय असेल अथवा कोणताही जनसामान्यांचा लढा आसेल संभाजी सेना नेहमीच अग्रेसर असते पुढे बोलताना ते म्हणाले की वर्षानुवर्षे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा रखडलेला विषय संभाजी सेनेने मार्गी लावला असून संभाजी सेना ही नुसती संघटना राहिली नसून ती एक मोठी चळवळ झाली आहे. खासदार उमेश पाटील म्हणाले की, संभाजी सेनेची स्थापना अतिशय संघर्षातून झाली असून तळागाळातील लोकांना व जनहित उपयोगी कार्य संभाजी सेना सतत करत असते. संभाजी सेना कायम अन्यायाविरुद्ध संघर्ष करीत असून नेहमीच संघर्षाची मानसिकता डोक्यात ठेवूनच कार्य करत असतात. आंदोलन कुठले का असेना ते सकारात्मक विचार घेऊनच करीत असतात. यावेळी उपस्थित पत्रकार रमेश चौधरी, एम. बी. पाटील, दिलीप घोरपडे, मुराद पटेल, स्वप्नील वडनेरे, विशाल कार्ड, गणेश पाटील, नारायण जाधव आणि आदी उपस्थित पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. मेहुणबारे येथील राज्यस्तरीय स्पीड बॉल विजेता संघातील विद्यार्थ्यांचा सत्कार खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. संघाचे क्रीडाशिक्षक राहुल साळुंखे यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी विजेत्या संघाला कजगावच्या एडवोकेट वसुधा भोसले राजपूत यांनी प्रोत्साहनपर पाचशे रुपयांचे रोख बक्षीस दिले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उमंगच्या संपदा पाटील, प्रतिभा मंगेश चव्हाण, सुचित्रा पाटील, सोनल साळुंखे, अनिता शर्मा, साधना शिरसाठ, सविता कुमावत, सुवर्ण राजपूत, पोतदार, आरस्ता माळकर आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सुनील पाटील, अविनाश काकडे, गिरीश पाटील, सुरेश पाटील, कृष्णा पाटील, लक्ष्मण बनकर, सुरेश तिरमली, राकेश पवार, राकेश जोशी, रवींद्र बोरसे, वाल्मीक बागुल, संजय अल्लाट, अब्दुल कादिर, किशन घुगे, गणेश वाघ, भगवान थोरात, जनार्दन कोळी, अनिकेत पाटील, शुभम राजपूत, राहुल आगवणे, संदीप जाधव, कृष्णा कोळी, महेंद्रसिंग राजपूत, रवींद्र वाणी, बापूराव पाटील, सुयोग नरवाडे, भैय्यासाहेब देशमुख, संतोष तायडे, गजानन पाटील, राकेश जोशी आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content