पालकमंत्र्यांची अशी ही सहृदयता ; रॅली थांबवून ॲम्बुलन्सला जाण्यासाठी मार्ग केला मोकळा

बुलढाणा – अमोल सराफ | ना. गुलाबराव पाटील हे पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच जिल्ह्यात आले असता त्यांची मोटरसायक रॅली काढून स्वागत करण्यात आले.  या रॅलीत ॲम्बुलन्स अडकली असता पालकमंत्री ना. पाटील  यांनी रॅली  थांबवून ॲम्बुलन्सला  जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिल्याने त्यांच्या सहृदयतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

राज्यामध्ये शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून घोषणा झाल्यानंतर गुलाबराव पाटील हे प्रथमच बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले आहेत  त्यांच्या स्वागतासाठी मेहकर शहरातील शितला माता मंदिर परिसरातून मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  ही रॅली आंबेडकर वाटिके जवळून जात असताना मार्गावरती ॲम्बुलन्स येत होती..  दरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील व खासदार प्रतापराव जाधव यांनी स्वागत थांबवून ॲम्बुलन्सला जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला आहे. मेहकर येथील खासदार प्रतापराव जाधव यांच्या होम ग्राउंड वर हिंदू गर्वगर्जना या यात्रेच्या सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेत ते विरोधकांवर आपली तोफ डागणार आहेत त्यामुळे पाटील हे विरोधकांवर कशा पद्धतीने आपली तोफ डागतील हे पाहणे औत्सुक्याचे  ठरणार आहे..

 

Protected Content