मुंबई प्रतिनिधी । भाजपचे पदाधिकारी धनंजय कुळकर्णी यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
भाजपचे डोंबिवली शहर उपाध्यक्ष धनंजय कुळकर्णी यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका निवेदनाद्वारे जोरदार टीका केली आहे. हे पहा भाजपचे पार्टी विथ डिफरन्स या शीर्षकाखाली पाटील यांनी हे निवेदन जाहीर केले आहे.
या निवेदनात नमूद केले आहे की, की डोंबिवलीतील भाजप शहर उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. चॉपर, तलवारी, एयरगन, फायटर्स, चाकू, सुरे, कुर्हाडी अशी शस्त्रास्त्र ताब्यात घेतली आहेत. येणार्या काळात भाजप कशाप्रकारे राज्य सांभाळणार हेच यातून पाहायला मिळते. या शस्त्रांचा वापर करून भाजपला कोणत्या दंगली घडवायच्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. भाजपचे पदाधिकारीच जर अशाप्रकारे बेकायदेशीर शस्त्रसाठा बाळगणार असतील तर राज्यात गुंड आणि दहशतवाद्यांची गरजच उरणार नाही.
अर्थात या शस्त्रांच्या मदतीने भाजपला दंगली घडवायच्या होत्या असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. यामुळे आता हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे.
हे पहा भाजपाचे पार्टी विद डिफ्रन्स..!
डोंबिवलीतील भाजप शहर उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा आज जप्त करण्यात आला. चॉपर, तलवारी, एयरगन, फायटर्स, चाकू, सुरे, कुऱ्हाडी अशी शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली आहेत. pic.twitter.com/bl9curzxbN— Jayant Patil (@Jayant_R_Patil) January 16, 2019