भुसावळात मध्यरात्री चोरट्यांनी २ लाखांची रोकड लांबविली

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील कंडारी येथे बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले दोन लाख रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष पांडुरंग खैरे  (वय-५८) रा. नागसेन कॉलनी, कंडारी ता. भुसावळ जि. जळगाव हे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी आहेत. ते आपल्या कुटुंबियांसह राहतात. १० ऑक्टोबर रोजी रात्री १२.३० ते २ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागच्या दरवाजाचे लोखंडी ग्रील वाकून कुलूप तोडले. घरातील कपाटातील ठेवलेले दोन लाख रूपयांची रोकड आणि  आणि सोन्याचे दागिने चोरून नेले. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान सुभाष खैरे यांनी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून चोरट्यांवर भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी करीत आहे.

 

Protected Content