शेतजमीन नोंदीत फेरफार : माजी नगराध्यक्ष निलेश चौधरींसह इतरांवर गुन्हा दाखल

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगावचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी यांच्यासह चार जणांच्या विरोधात शेतजमीनीत फेरफार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगावचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी यांच्यासह एकूण चार जणांच्या विरोधात धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यात धरणगाव तालुक्यातील नांदेड येथील तत्कालीन तलाठी रोशनी मोरे, तत्कालीन मंडळ अधिकारी वनराज बुधा पाटील, यांच्यासह नाशिक येथील भरतसिंह देवीदास परदेशी आणि निलेश सुरेश चौधरी या संशयितांचा समावेश आहे.

धरणगावचे नायब तहसीलदार जयंत पुंडलीक भट्ट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महसूल खात्याकडे नांदेड येथील देविदास रामदास रडे यांनी तक्रार दिली होती. यात त्यांच्या शेत जमीनीच्या नोंदीत तत्कालीन नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्यासह इतरांनी त्यांना अधिकार नसतांना फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता.

या तक्रारीवरून महसूल खात्याने चौकशी केल्यानंतर नायब तहसीलदार जयंत पुंडलीक भट्ट यांनी फिर्याद दिल्यानुसार या चार जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यामध्ये नांदेड येथील तत्कालीन तलाठी रोशनी मोरे, तत्कालीन मंडळ अधिकारी वनराज बुधा पाटील, यांच्यासह नाशिक येथील भरतसिंह देवीदास परदेशी आणि निलेश सुरेश चौधरी यांचा समावेश आहे.

Protected Content