पत्र्याच्या शेडमधून चोरट्यांनी पिकअप गाडी लांबविली

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पत्र्याच्या शेडमध्ये पार्किंग करून लावलेली महिंद्रा पिकअप व्हॅन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, संजयकुमार सुभाषचंद्र अग्रवाल (वय-५८) रा. ओंकार नगर, यावल रोड चोपडा हे व्यापारी आहे. त्यांचे शहरात संजय अग्रवाल नावाचे दुकान आहे. त्यांच्या दुकानाच्या मागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी त्यांच्या मालकीची (एमएच १९ बीएम ७७६०) महिंद्रा पिकअप गाडी पार्कींग करून लावली होती. अज्ञात चोरट्यांनी २४ मे रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ९५ हजार रूपये किंमतीची पिकअप गाडी चोरून नेली. हा प्रकार २५ मे रोजी सकाळी उघडकीला आला. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर जवागे करीत आहे

Protected Content