यावेळी राज्यसभा बिनविरोध शक्यता नाही? ना. अजित पवार

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | छत्रपती संभाजीराजेनी शिवसेनेतर्फे उमेदवारी न घेता अपक्ष म्हणूनच निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे  राज्यसभा निवडणूक बिनविरोध नसून अपक्ष आणि अतिरिक्त मते मिळवणारा सदस्य राज्यसभेवर जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी म्हटले आहे.

दर दोन वर्षांनी राज्यसभेच्या ६ सदस्यांच्या निवडीनुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी एक, तर शिवसेना दोन जागा लढवत आहे. भाजपाच्या  संख्याबळानुसार त्यांच्या दोन जागा सहज निवडून येतील तर तिसऱ्या जागेसाठी भाजप तसेच शिवसेनेकडे काही मते आहेत. गतवेळी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी पुढच्या निवडणुकीत आम्ही तुमच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ, असे पवारांच्या सांगण्यानुसार शिवसेनेने राष्ट्रवादीच्या फौजिया खान यांना पाठींबा देत त्यांची अतिरिक्त मते दिल्याने राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या होत्या, त्यानुसार आता शिवसेना जो उमेदवार उभा करेल, त्याच्या पाठिशी राष्ट्रवादीची मते असतील.आणि यावरूनच ज्या पक्षाकडे आमदार संख्येच्या पाठबळानुसार राज्यसभेवर किती सदस्य जाणार हे ठरणार असल्यानेच आता राज्यसभेच्या सदस्य निवडीसाठी आकडेमोडीला वेग आला आहे.

यावेळची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. त्यामुळे मतदान होईल. पक्षाचे अधिकृत मतदार दाखवून मतदान केले जाते. तसेच अपक्षांना मत दाखवण्याचा दाखवण्याचा अधिकार नाही. गेल्यावेळी गुजरातमध्ये अपक्षांनी दाखवून मतदान केले, ती मते अवैध ठरवली गेली. त्यामुळे ज्या पक्षाचे सहयोगी अपक्ष आमदार असतील, त्यांना दाखवण्याचे काम झाले असते तरच हि निवडणूक बिनविरोध झाली असती. पण आता सगळी मदार अपक्ष आमदारांवर आहे.
यात विशेषत: भाजपआणि सहयोगी, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांचे आमदार वगळता अपक्ष आमदार आपली मते कुणाच्या झोळीत टाकणार, यावरून कोणत्या पक्षाचा अतिरिक्त सदस्य राज्यसभेवर निवडून जाणार या आकडेमोडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले.

संभाजीराजे निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर ठाम राहिले तर १० जूनला प्रत्यक्ष मतदान होईल. भाजपकडे २२ अतिरिक्त मते आणि काही अपक्षांची साथ आहे. अपक्ष व छोटय़ा पक्षांचा पाठिंबा मिळविण्यात संभाजीराजे किंवा भाजपला यश आले तरच भाजपला ४१.०१ मतांचा टप्पा गाठता येईल. परंतु सध्या तरी ही शक्यता कमी दिसते असेही पवार यांनी म्हटले आहे.

Protected Content