रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील खानापूर येथे असलेले गोडाऊनच्या शटरला लावलेले कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ७४ हजाराचा डिंक चोरुन नेल्याची घटना घडली आहे.यामुळे एकच खळबळ उडाली असुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी पोलीस सूत्रांकडून मिळाली माहिती अशी की, “डींक व्यापारी सय्यद जमील (वय ४७) रा.खानका वॉड शनवारा रोड बुरहानपूर (मध्य प्रदेश) यांचा खानापुर (ता रावेर) येथे डींकाचे खाजगी गोडाऊन आहे. येथे दि १० जून ते दि १२ जून दरम्यान कोणी तरी अज्ञात चोरट्याने गोडाउनचे कुलूप तोडून गोडाऊन मध्ये अनअधिकृत प्रवेश केला व गोडाऊन मध्ये ठेवलेला ७४ हजार किमतीचा एक टन ५४० किलो डींक चोरुन घेऊन गेला.
या संदर्भात डींक मालक सय्यद जमील यांच्या फिर्यादीवरुन रावेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक शितलकुमार नाईक करीत आहेत.