कारचा उघडला दरवाजा आणि झाला दुचाकीचा अपघात

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील ममुराबाद कृषी विज्ञान केंद्राजवळ एकाने अचानक कारचा दरवाजा उघडल्याने मागून येणारा दुचाकीस्वार कारवर आदळला गेल्याची घटना घडली आहे. यात दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, “जळगाव तालुक्यातील नशिराबादमधील खालच्या अळीत राहणारे चेतन सोपान रोटे (वय-३५) हे (एमएच १९ बी ६२३०) आपल्या दुचाकीने ममुराबाद येथून जळगावकडे येत होते. यावेळी सचिन एकनाथ देशमुख रा. पिंपळकोठा ता. एरंडोल हे त्यांची (एमएच १९ सी डबल्यू  ५७८२) क्रमांकाच्या कार भरधाव वेगाने चालवित होते. यावेळी रोटे यांना कारने मागून ओव्हरटेक करीत कार रोटेंच्या दुचाकीपुढे आणत अचानक थांबविली.

त्यानंतर कारचालकाने रस्त्यावर कार उभी करुन कारचा दरवाजा उघडला. कारचा दरवाजा अचानक उघडल्यामुळे मागून दुचाकीवर येणारे रोटे कारवर जावून आदळले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून ते जखमी झाले. तसेच त्यांच्या दुचाकीचे देखील नुकसान झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी जखमीच्या तक्रारीवरुन कारचालक सचिन एकनाथ देशमुख यांच्याविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास साहेबराव पाटील करीत आहे.

Protected Content