चोरट्यांनी बंद घर फोडले; ६० हजारांचे ऐवज लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पिंप्राळा परिसरातील विद्यानगरात बंद घर फोडून घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ६० हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १३ जुलै रोजी सकाळी ८ वाजता समोर आले आहे. याप्रकरणी गुरुवारी १८ जुलै रोजी रात्री १० वाजता रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, सपना अभिषेक जैन रा.भोपाल मध्यप्रदेश यांचे वडीलांचे घर पिंप्राळा परिसरातील विद्यानगरात आहे. काही दिवसांपासून त्यांच्या वडीलांचे घर बंद होते. त्यामुळे अज्ञात चोरट्यांनी याचा फायदा घेत बंद घराच्या दरवाजाचे कडीकोयंडा तोडून घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ५९ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना सपना जैन यांना समजली. त्यांनी जळगावात येवून घरात पाहणी केली असताना घरात चोरी झाल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी रामानंद नगर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार गुरुवारी १८ जुलै रोजी रात्री १० वाजता रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ सुशील चौधरी करीत आहे.

Protected Content