जळगावातील संवेदनशिल भागात राहणार सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील संवेदनशिल भागात एकुण १२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. याचे लोकार्पण पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जे. शेखर पाटीलयांच्याहस्ते बुधवारी २१ जून रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आले.

 

जळगाव शहरातील सम्राट कॉलनी, वडेश्वर महादेव मंदीर, मासूमवाडी, कासमवाडी परिसर हा संवेदनशील भाग आहे. याठिकाणी लहान मोठे गुन्हे घडत असतात. कोणताही अनुचित प्रकार होवू नये यासाठी या परिसरात एकुण १२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जे. शेखर पाटील यांच्याहस्ते बुधवारी २१ जून  रोजी दुपारी साडेचार वाजता सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, पोलीस उपअधिक्षक संदीप गावीत, पोलीस उपअधिक्षक आप्पासो पवार, एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील, पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, नगरसेवक कुंदन काळे, रइस बागवान, गणी पिंटू परेदशी, जाकीर अब्दुल सत्तार मेमन, इमाम जावेद अख्तर यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, विश्वास बोरसे, पोलीस हवलदार दिपक चौधरी, मंदर पाटील यांनी परिश्रम घेतले.

Protected Content