भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील गोठ्यातून ट्रॅक्टर व रोटर चोरून नेणाऱ्या संशयित आरोपीला भुसावळ तालुका पोलीसांनी कारवाई करत अटक केली आहे. याप्रकरणी मंगळवारी १ जुलै रोजी दुपारी दीड वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत संतोष पाटील वय ४० रा. साकेगाव ता. भुसावळ असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे मयूर सारंगधर पाटील वय ३० हा तरूण वास्तव्याला असून शेती करून तो आपला उदरनिर्वाह करतो. ३० जून ते १ जुलै रोजीच्या मध्यरात्री त्यांच्या गोठ्यात पार्कींगला लावलेले ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ बीजी २१२८) व शेतीसाठी लागणारे रोटार चोरट्यांनी चोरून नेले होते. हा प्रकार मंगळवारी १ जुलै रोजी मध्यरात्री दीड वाजता समोर आला आहे. याप्रकरणी मयूर पाटील याने भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी कारवाई करत संशयित आरोपी अनिकेत संतोष पाटील रा. साकेगाव ता. भुसावळ याला अटक केली. त्याने चोरून नेलेले ट्रॅक्टर व रोटर पोलीसांनी जप्त केले आहे. पुढील तपास पोहेकॉ वाल्मीक सोनवणे हे करीत आहे.