जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी ३० जून रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. याप्रकरणी मंगळवारी १ जुलै रोजी पहाटे ४ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. सोमवारी ३० जून रोजी रात्री ११ वाजता पिडीत मुलगी ही घरात झोपलेली असतांना गावात राहणारा संशयित आरोपी सुर्यभान प्रकाश सपकाळे हा घरात घुसला, पिडीत मुलगी एकटी असल्याचे पाहून त्याने तिच्यावर जबरदस्ती अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्न केला. हा प्रकार पिडीत मुलीने नातेवाईकांना सांगितला. त्यानुसार तिच्या वडीलांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी सुर्यभान प्रकाश सपकाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे हे करीत आहे.