जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील शहरातील रामनगर भागातून आयशर चोरून पसार झालेल्या संशयित आरोपीला छत्रपती संभाजी नगरातून अटक केली आहे. त्यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. समीर नसीर खान उर्फ पठाण (४१, रा. पडेगाव, छावणी, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील राम नगर येथील रहिवाशी जावेद लतिफ पटेल (रा. रामनगर) यांच्या मालकीची आयशर क्रमांक (एमएच १९, सीवाय ४८४६ ) रामनगर परिसरात खासगी रूग्णालयात समोर पार्कींग लावलेली होती. त्यावेळी ८ सप्टेंबर २०२२ रोजी पार्कींगला लावलेली आयशर ट्रक चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, चोरीला गेलेला ट्रक हा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील समीर नसीर खान उर्फ पठाण याने चोरून नेल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी संशयिताला अटक करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, छगन तायडे, राहुल रगडे, सचिन पाटील, योगेश बारी, साईनाथ मुंढे यांनी कारवाई करत संशयित आरोपी याला समीर नसीर खान उर्फ पठाण याला छत्रपती संभाजी नगर येथून अटक केली. त्यांच्याकडून चोरीला गेलेला ट्रक जप्त करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायमुर्ती श्रीमती एम एम बडे यांनी ९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.