लोहटार येथे कटलरी दुकान फोडले; ३९ हजाराचा मुद्देमाल लांबविला

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील लोहटार गावातील बसस्थानकाजवळील दुकान मध्यरात्री अज्ञात चोरट्‌यांनी फोडून ३९ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, सुनिल रायसिंग परदेशी (वय-४८) रा. लोहटार ता. पाचोरा यांचे गावातील बसस्थानकाजवळ किरणा दुकान व योगेश किराण आणि शालीनी रेडीमेट कटलरी, जनरल दुकान आहे. ७ जून रोजी रात्री १० वाजता त्यांनी दुकान बंद केले व घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी ८ जून रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांचे दुकान फोडलेले दिसून आले. दुकानातील ३ हजार रूपयांचा किरणा, २० हजाराचा मोबाईल, कटलरी सामान असा एकुण ३९ हजार ३३० रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी सुनिल परदेशी यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुर्यकांत नाईक करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.