उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार नाही; २२ जानेवारीला नाशिकमध्ये भव्य सभेचे आयोजन

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । राम मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम हा धार्मिक आणि अस्मितेचा असावा. याला राजकीय रंग येऊ नयेत, आम्हाला देखील ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी आम्ही रामाच्या दर्शनाला जाऊ मात्र तोपर्यंत मानपाण्याचा कार्यक्रम बाजूला ठेवायला हवा, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच आपण 22 जानेवारी रोजी राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहला धार्मिक आणि अस्मितेचा असावा. हा अभिमानाचा, अस्मितेचा आणि आनंदाचा क्षण आहे. या सोहळ्याला कोणताही राजकीय रंग येऊ नये. राम आमचा आहे. आम्ही केव्हाही अयोध्येला जाऊ शकतो, असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, बाबरी पाडल्यानंतर 25 ते 30 वर्षांनी न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूला निकाल दिला. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन होत आहे. त्यासाठी अनेक संघर्ष करावा लागला. आम्ही 22 जानेवारीला नाशकातील काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहोत. काळाराम मंदिरासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी यांनी संघर्ष केला होता. राम आमचासुद्धा आहे, असे त्यांनी सांगितले होते. मीनाताई ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने शिवाजी पार्क येथील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सपत्निक आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले, आज 6 जानेवारी माँ ची जयंती आहे. त्यानिमित्ताने दरवर्षी आम्ही अभिवादन करण्यासाठी येत असतो. आजही आम्ही अभिवादन केलं. 23 जानेवारीला हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. यावर्षी 23 जानेवारीला शिवसेनेचे शिबीर होणार आहे. त्याच दिवशी रात्री अनंत कानेरे मैदान गोल्फक्लब येथे शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे. प्रभू रामचंद्र काही वर्ष पंचवटीला देखील वास्तव्यास होते. त्यामुळे त्यादिवशी नाशकात गोदावरी नदीच्या तीरावर एक महाआरती देखील होईल. हा अभिमानाचा, अस्मितेचा आणि आनंदाचा क्षण आहे.

Protected Content