जळगाव प्रतिनिधी । जुन्या नशिराबाद रोडवरील श्रीकृष्ण नगरातील तरूणाची दुचाकी राहत्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर असे की, अविनाश प्रकाश सोनार (वय-३७) रा. श्रीकृष्ण नगर, जुना नशिराबाद रोड यांच्याकडे त्यांची (एमएच १९ बीएक्स ९६९४) क्रमांकाची दुचाकी ९ मे रोजी रात्री घरासमोर पार्किंगला लावली होती. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे १० रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आले. याप्रकरणी अविनाश सोनार यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रकाश पाटील करीत आहे.