जळगाव प्रतिनिधी । जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंधी कॉलनी आणि विसनजी नगरातून एकाच दिवशी दोन दुचाकींची चोरी झाल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
![](https://livetrends.news/wp-content/uploads/2025/01/advt-1.jpg)
याबाबत माहिती अशी की, पहिल्या घटनेतील योगेश रमेश चौधरी (वय-३५) रा. आसोदा ता.जि.जळगाव हे फुल विक्रीचा व्यवसाय करतात. २२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्यांनी विसनजी नगरातील गायत्री मंदीराजवळ (एमएच १९ बीटी ०८८९) क्रमांकाची दुचाकी पार्कींग करून लावली होती. अज्ञात चोरट्यांनी २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत सिंधी कॉलनी परिसरातील युनियन बँकसमोर संदीप बाळकृष्ण चौगुले (वय-३७) रा. विवेकानंद नगर साई बाब मंदीरासमोर जिल्हापेठ यांची (एमएच ०९ एडब्ल्यू ३८३४) क्रमांकाची दुचाकी पार्किंगला लावली होती. अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होत. दरम्यान जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्याप्रमाणावर गुन्हेगारी वाढली असून याकडे पोलीस निरीक्षक वाकोडे यांनी लक्ष देण्याची मागणी नागरीकांकडून केली जात आहे.