डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात जागतिक श्रवणदिनानिमित्त मोफत निदान व मार्गदर्शन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात जागतिक श्रवण दिनाच्या निमित्ताने शुक्रवारी ३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता कान-नाक-घसा विभागाच्या वतीने आयोजित शिबीरात श्रवण दिनाचे महत्व आणि त्याचे निदान याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या शिबीरात आलेल्या रूग्णांची मोफत नि:शुल्क ऑडिओमेट्री व बेरा तपासणीही करण्यात आली.

जागतिक श्रवण दिनानिमित्त शुक्रवारी ३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता डॉ.केतकी हॉल येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ‘इयर अ‍ॅण्ड हियरिंग केअर फॉर ऑल, लेट्स मेक इट अ रिअ‍ॅलिटी’ ही यावर्षीची थीम होती. याप्रसंगी ऑडिओलॉजिस्ट डॉ.गौरव पाटील यांच्याद्वारे ओपीडीत आलेल्या २८ रुग्णांची ऑडिओमेट्री तर ५ बालकांची बेरा तपासणी करण्यात आली.

याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ.माया आर्विकर, अस्थिरोग विभागप्रमुख डॉ.दिपक अग्रवाल, बालरोग विभागप्रमुख डॉ.अनंत बेंडाळे, डॉ.उमाकांत अणेकर, ऑडिओलॉजिस्ट डॉ.गौरव पाटील, इएनटी विभाग प्रमुख डॉ.अनुश्री अग्रवाल, डॉ.विक्रांत वझे, डॉ.पंकजा बेंडाळे यांची प्रमुख उपस्थीती होती. याप्रसंगी डॉ.अनुश्री अग्रवाल यांनी प्रास्ताविक तर डॉ.गौरव पाटील यांनी श्रवण दिनाचे महत्व आणि श्रवणदोषाची तपासणी केव्हा करावी तसेच त्यावर उपाय काय याची सविस्तर माहिती दिली. प्रमुख अतिथी माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी उपक्रमाचे कौतुक करीत पालकांनी आपल्या प्रि-मॅच्युअर किंवा एनआयसीयूत असलेल्या बालकांच्या कानाची अवश्य तपासणी करुन घ्यावी असे आवाहनही केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तृप्ती भट यांनी तर आभार डॉ.विक्रांत वझे यांनी मानले.

Protected Content