टॉवरवरील तीन आरआरयु कार्डची चोरी; शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या गीताई नगरातील एअरटेल कंपनीचे टॉवरला लावलेले आरआरयु कार्डचे ३ नग अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे घटना समोर आले. या संदर्भात शुक्रवारी ५ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना खेडीरोड मधील गीताई नगरात एअरटेल कंपनीचे टॉवर लावण्यात आलेले आहे. या टॉवरमध्ये आरआरयू कार्डचे वापर करण्यात आलेले आहे. या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी टॉवरला लावलेले आरआरयू कार्डचे तीन नग चोरून नेले. हा प्रकार बुधवारी ३ जानेवारी रात्री ८ ते गुरूवारी ४ जानेवारी सकाळी ९.३० वाजता दरम्यान घडलेला आहे. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर सुरक्षा अधिकारी रवींद्र पाटील यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार शुक्रवारी ५ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश गवळी हे करीत आहे.

Protected Content