डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांच्या व्याख्यानाचे आयोजन 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | भारतीय सांस्कृतिक संबंध परिषेदेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खा. डॉ. विनयराव सहस्त्रबुध्दे यांचे दि. २८ रोजी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दुपारी ३ वा. भारताची सौम्य संपदा या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी डॉ. सहस्त्रबुध्दे हे विद्यार्थ्यांशी हितगुजही करणार आहेत.

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषेदेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खा. डॉ. विनयराव सहस्त्रबुध्दे हे दि. २७ आणि २८ रोजी जळगाव दौर्‍यावर येत आहे. डॉ. सहस्त्रबुध्दे यांचा हा दौरा खासगी असून ते आप्तेष्टांच्या भेटी घेणार आहेत. तसेच डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांचे भारताची सौम्य संपदा या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. दि. २८ रोजी दुपारी ३ वा. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. केतकी सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. तसेच याठिकाणी डॉ. विनय सहस्त्रबुध्दे हे विद्यार्थ्यांशी देखिल हितगुज करणार आहे.

याप्रसंगी महाविद्यालयाचे चेअरमन तथा माजी खा. डॉ. उल्हास पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन.एस. आर्विकर, गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमानंतर डॉ. विनय सहस्त्रबुध्दे हे डॉ. उल्हास पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देणार आहेत. तरी या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.

Protected Content