Home क्राईम धार्मिक मंडळासाठी घेतलेले तेलाच्या डब्यांची चोरी; गुन्हा दाखल

धार्मिक मंडळासाठी घेतलेले तेलाच्या डब्यांची चोरी; गुन्हा दाखल

0
128


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मारुती पेठेत एक विचित्र आणि धक्कादायक चोरीची घटना घडली आहे. धार्मिक आणि सामाजिक मंडळाला आर्थिक मदत करण्यासाठी एका वृद्ध महिलेने विकत घेतलेले तेलाचे डबे अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातून चोरून नेले. ही घटना १६ एप्रिल रोजी घडली असून, या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारुती पेठेतील वीर जवान मित्र मंडळ दरवर्षी वणी गडावर दिंडीचे आयोजन करते. या दिंडीसाठी अनेक दानशूर व्यक्ती वस्तूंच्या स्वरूपात मदत करतात. यंदा दिंडीहून परतल्यानंतर वाद्य वाजवणाऱ्या कलाकारांना देण्यासाठी मंडळाकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे मंडळाच्या अध्यक्षांनी परिसरातील ७६ वर्षीय कमल भागवत काळे यांना मंडळाला देणगी म्हणून मिळालेले तेलाचे प्रत्येकी १५ किलो वजनाचे तीन डबे विकत घेण्याची विनंती केली.

कमल काळे यांनी मंडळाच्या मदतीसाठी ते डबे विकत घेतले. मात्र, त्या गावाला गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातून हे तेलाचे डबे चोरून नेले. गावाहून परतल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी तातडीने शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीत त्यांनी एका व्यक्तीवर संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल युवराज कोळी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत


Protected Content

Play sound