शेतातील मोबाईल टॉवरच्या साहित्यांची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील सावखेडा शिवारातील देवनगर येथील शेतातून मोबाईल टॉवरचे १४ हजार रूपये किंमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रविवारी ४ जानेवारी रोजी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील सावखेडा शिवारातील देवनगर येथील शेतात एअरटेल कंपनीचे टॉवर बसविण्यात आलेले आहे. या ठिकाणी कंपाऊंच्या आवारात कंपनीच्या मालकीचे काही साहित्य ठेवण्यात आलेले आहे. दरम्यान २८ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या ठिकाणी ठेवण्यात आलेले १४ हजार रूपये किंमतीचे साहित्य चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर देखरेख ठेवणारे कर्मचारी राजेश शामकांत पाटील वय ५० रा. निवृत्ती नगर, जळगाव यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. त्यानंतर जळगाव तालुका पोलीसांशी संपर्क साधून चोरी झाल्याबाबत माहिती दिली. पोलीसांनी चोरीच्या ठिकाण येवून घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर कर्मचारी राजेश पाटील यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार रविवारी ४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ धनराज पाटील हे करीत आहे.

Protected Content