Home क्राईम दुचाकी चालवतांना मोबाईलवर बोलणे पडले महागात; दोन जणांवर गुन्हा दाखल

दुचाकी चालवतांना मोबाईलवर बोलणे पडले महागात; दोन जणांवर गुन्हा दाखल


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुचाकी चालवत असताना मोबाईलवर बोलत जाणाऱ्या दोन जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये शेख अरशद फकीर मोहम्मद शेख (२९, सुप्रिम कॉलनी) व करण सुनीलकुमार केसवाणी (२८, रा. मोहाडी रोड) यांचा समावेश आहे. ही कारवाई शनिवार, ३ फेब्रुवारी रोजी फुले मार्केटसमोर करण्यात आली. दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलत जाणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत असताना फुले मार्केटसमोर दोन जण मोबाईलवर बोलताना आढळले. त्यावेळी शहर पोलिसांनी त्यांना थांबवून कारवाई केली. या प्रकरणी पोहेकॉ राजीव जाधव व पोहेकॉ शैलेंद्र बाविस्कर यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound