जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील मन्यारखेडा शिवारातील एमआयडीसीतील पत्र्याच्या शेडमधून गुरूवारी रात्री ३० हजार रूपये किंमतीचे जनरेटर आणि वजनाचा काटा व लोखंडी जाळ्याच्या साहित्याची चोरी केल्याचे उघडकीला आले आहे. चोरीप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, अशोक पंडीत पाटील (वय-४५) रा. शिक्षक कॉलनी गुजराल पेट्रोलपंप जळगाव यांचे मन्यारखेडा एमआयडीसीती पत्री शेड आहे. ६ ते २९ एप्रिल २०२१ दरम्यान त्यांच्या पत्र्याच्या शेडमधून त्यांच्या मालकीचे किर्लोस्कर २० हजार रूपये कंपनीचे जनरेटर आणि १० हजार रूपये किंमतीचे वजन काटा, पाण्याची मोटार ग्राडर मशिनीच्या जाळ्या आणि सहा फावडे असा एकुण मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे २९ एप्रिल रोजी सायंकाळी उघडकीला आले. परिसरात शोधाशोध करून काहीच माहिती न मिळाल्याने त्यांनी नशिराबाद पोलीस ठाणे गाठले. अशोक पाटील यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्र पाटील करीत आहे.