जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसीतील एका कंपनीतून एकाने मशिनरी वस्तू चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर महिती अशी की, किशोर रमेश कटारिया (वय-३८) रा. गणपती नगर जळगाव यांचे एमआयडीसीतील सेक्टर एच २२ मध्ये एस.एस.डी. फुडस नावाची दाल कंपनी आहे. १ जानेवारी रात्री ८ वाजता ते २ जानेवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान त्यांच्या कंपनीच्या आवारात असलेल्या लोखंडी मशीनरी यात मोटार, पुल्ली, लोखंडी स्टॅण्ड आणि मशिनची वायर असा एकुण ४१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल दिनकर उर्फ पिण्या रोहिदास चव्हाण (वय-२२) रा. मच्छी मार्केट सुप्रिम कॉलनी याने चोरून नेल्याचे उघडकीला आहे. या संदर्भात किशोर कटारिया यांनी सोमवारी २४ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी दिनकर चव्हाण याच्याविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी संशयित आरोपी दिनकर उर्फ पिण्या रोहिदास चव्हाण याला सोमवारी २४ जानेवारी रोजी रात्री उशीरा अटक केली आहे.