भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । दीपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या रेल्वे बोगद्याजवळ लोखंडी प्लेटा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मंगळवारी ३० जानेवारी रोजी रात्री १० वाजता समोर आली आहे. या संदर्भात बुधवार ३१ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या रेल्वे बोगद्याजवळ १ हजार ८०० रुपये किमतीचे लोखंडी प्लेटांची अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना मंगळवार ३० जानेवारी रोजी रात्री १० वाजता समोर आली आहे. या संदर्भात दिपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्राचे सुरक्षा रक्षक अरुण सुभाष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात बुधवार ३१ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश पालवे हे करीत आहे.