अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांची विद्या परिषदेवर नियुक्ती

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्या परिषदेवर वैद्यकीय शाखेतून निवड करण्यात आली आहे. यामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

राज्यभरातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील शैक्षणिक व आरोग्यविषयक धोरण निश्चित करण्यासाठी विद्या परिषद काम करीत असते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील धोरण ठरवणं, राज्यातील दुर्गम भागातील विविध आजारांचा अभ्यास करून रूपरेषा ठरवणे, ध्येयधोरण आदि कार्य विद्या परिषदेचे असते.

अशा महत्त्वाच्या परिषदेवर वैद्यकीय शाखेतून डॉ. गिरीश विठ्ठलराव ठाकूर यांची नियुक्ती विद्यापीठाकडून करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांची राज्यपाल नियुक्त अधिसभेवर सदस्य म्हणून नियुक्ती झालेली आहे. या निवडीबद्दल त्यांचे महाविद्यालयातील विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, परिचारिका यांचे जिल्ह्यातील विविध शासकीय व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Protected Content