पेव्हर ब्लॉक कंपनीतून सामानांची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील निमखेडी शिवारात असलेल्या द्वारका नगर स्टॉप येथून एका पेवर ब्लॉक बनविणाऱ्या फॅक्टरी मधून ४८हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत रविवार २३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुका पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, जुगल संजय बागुल वय २७ रा. दांडेकर नगर, जळगाव यांचे निमखेडे शिवारात असलेल्या द्वारका नगरात पेव्हर ब्लॉक करण्याचे फॅक्टरी आहे. त्या ठिकाणी त्यांनी त्यांचे सामान ठेवले आहे. दरम्यान २२ ऑक्टोबर रात्री ११ ते २३ ऑक्टोबर सकाळी ९ वाजेच्या दरम्यान आज्ञात चोरट्याने त्यांचे पेव्हर ब्लॉक बनण्याचे मोल्ड म्हणजे साचे आणि इतर साहित्य असा एकूण ४८ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल आज्ञात चोरट्याने चोरून नेला या संदर्भात त्यांनी रविवार २३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव येऊन तक्रार दिली.. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला

 

Protected Content