जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील विवेकानंद नगर येथील श्री संतुलन हॉस्पिटल येथील डॉक्टरच्या घरातून एका महिलेने सोन्याचे बिस्किट आणि २० लाख रुपयांची रोकड असा एकूण २४ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी गुरुवारी २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छायाबाई संग्राम विसपुते वय-३९, रा. रामेश्वर कॉलनी जळगाव असे महिलेचे नाव आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील विवेकानंद नगर येथे श्री संतुलन हॉस्पिटल येथे राहणारे डॉ. प्रकाश बुधा चिते वय-४३ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. वैद्यकीय सेवा करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. त्यांच्या हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर त्यांचे राहत्या घरात मे २०२४ ते डिसेंबर २०२४ पर्यंत संशयित महिला छायाबाई संग्राम विसपुते हिने वेळोवेळी घरातून २० लाख रुपयांची रोकड आणि ५२ g वजनाची सोन्याचे बिस्कीट असा एकूण २४ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल घरातून चोरून नेला आहे. दरम्यान ही घटना उघडकीला आल्यानंतर डॉ. प्रकाश चित्ते यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुद्देमाल चोरून येणाऱ्या छायाबाई संग्राम विसपुते यांच्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागाला वर्ग करण्यात आला आहे.