फनीरायडर सायकलिंग गृपने मंगळग्रदह मंदीराला दिली भेट

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील भारतातील अति प्राचीन जागृत देवस्थान मंगळ ग्रह मंदिराला धुळे येथील फनीरायडर सायकलिंग ग्रुप ने सदिच्छा भेट दिली.

११ भाविक धुळे येथुन पहाटे ६ वाजेला सायकल वारी करून मंगळ मंदिराला सकाळी ७ वाजेपर्यंत त्यांचे आगमन झाले होते. यावेळी बोलतांना जय हिंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पंजाबराव पवार यांनी बोलतांना मंदिरातील स्वच्छता, नम्रता व पारदर्शक या त्रिसुत्रीचे तोंड भरून कौतुक केले व मंदिर परिसरात प्रवेश केल्यानंतर सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जाणवला असे त्यांनी बोलतांना सांगितले.

यावेळी विजय पाटील, प्रा. भैय्यासाहेब पाटील, प्रा. नितीन पाटील, दिवाण सूर्यवंशी, रवींद्र वाघ, उमेश खैरनार, मयुर देवरे, भरत देवरे, सागर मासुळे आणि विजय पाटील या सायकल रायडर भाविकांनी मंगळग्रह देवदेचे दर्शन घेत मंदिर आवारातील निसर्ग रम्य परिसराचा आनंद घेतला. यावेळी त्यांचा मंगळ ग्रह मंदिराचे उपाध्यक्ष एस एन पाटील यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला.

Protected Content