भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे शिवारातील फार्म हाऊसचे बंद घराचे कुलूप तोडून घरातील लाकडी कपाटातून १० हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना शनिवारी समोर आली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ तालुका पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, दिलीपकुमार मदनलाल ललवाणी (वय-६३, रा. दत्तधाम, मदन तारा बिल्डिंग, भुसावळ) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून ते सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. त्यांचे भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे शिवारात शेत गट नंबर ७५० येथे फार्म हाऊस आहे. १ सप्टेंबर सायंकाळी ५ वाजता ते २ सप्टेंबर सकाळी १० वाजेच्या दरम्यान त्यांच्या शेतातील फार्म हाऊस बंद असताना अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करत लाकडी कपाटात ठेवलेले १० हजार रुपयांची रोकड चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर दिलीपकुमार ललवाणी यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री ८ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ दीपक जाधव करीत आहे.