ट्रकने दिलेल्या धडकेत कारमधील एकाचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावहून भुसावळकडे रॉंगसाईडने जाणार्‍या भरधाव ट्रकने समोरुन येणार्‍या कारला जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी ९ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास फोर्ड शोरुम जवळ घडली. या अपघातात नरेंद्रसिंग अमरसिंग राजपुत (वय-३२, रा. भुसावळ) हा तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगावकडून (जीजे १३ ए एक्स ९४९५) क्रमांकाचा मालवाहू ट्रक हा रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत होत भरधाव वेगाने रॉंगसाईने भुसावळकडे जात होता. यावेळी भुसावळकडून येणार्‍या (एमएच २७ बी झेड ९३८२) क्रमांकाच्या कारला ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास फोर्ड शोरुमच्या अलीकडे झाली. या धडक इतकी जोरदार होती की, कारमध्ये क्लीनर साईडला बसलेले नरेंद्रसिंग अमरसिंग राजपूत यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारचालक दिपेन्द्र मच्छीन्द्र पवार (रा. वाकळी ह. मु. गोपाळ नगर जळगाव) धडक देवून घटनास्थळाहून पळून गेला. याप्रकरणी जखमीच्या फिर्यादीवरुन ट्रकचालकाविरुद्ध नशिराबाद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content