चालकाचा अचानक डोळा लागल्याने अपघात; तीन ठार, चार जखमी

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | समृद्धी महामार्गावर अपघाताच्या मालिका संपण्याचा नावच घेत नाही आहे. ६ मे रोजी आज महामार्गावर नागपूर कॉरिडॉरजवळ सकाळच्या सुमारास भरधाव वेगात जाणाऱ्या कारच्या चालकाचा डोळा लागल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला जाऊन धडकली.

कारमधील तीन जण जागीच ठार झाले, तर चार जण गंभीर जखमी आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली आहे. तर अपघातातील जखमींवर सिंदखेडराजा येथील रुग्णालयात उपचार करण्यासाठी हलविण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला आहे.

Protected Content