बांगलादेशला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज

cricket teem

 

मुंबई वृत्तसंस्था । भारतीय संघाने राजकोट आणि नागपूरच्या मैदानावर दणक्यात पुनरागमन केले. या मालिकेनंतर भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. येत्या १४ नोव्हेंबरला इंदूर येथे तर २२ नोव्हेंबरला कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर कसोटी सामना रंगणार आहे.

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध टी-२० मालिकेत विजय मिळवला. दिल्लीच्या मैदानात पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मात्र या कालावधीदरम्यान भारतीय संघाने आपल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याची तयारी सुरु केली आहे. तसेच २२ नोव्हेंबरपासून कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर दिवस-रात्र कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ इंदूरमध्ये आपल्या सरावसत्रातले काही तास गुलाबी चेंडूवर सराव करणार आहे. इंदूरच्या मैदानाचे मुख्य क्युरेटर समंदरसिंह चौहान यांच्याकडे भारतीय संघाने सरावासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.

भारतीय संघ उद्या संध्याकाळी ५ ते ६ दरम्यान गुलाबी चेंडूवर सराव करणार आहे. आतापर्यंत भारतीय संघ एकही दिवस-रात्र कसोटी सामना खेळलेला नाहीये. सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर संघटनेत बदलांचे वारे वाहायला लागले आहेत. त्यामुळे कसोटी मालिकेत भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Protected Content