जम्मू-काश्मीरमध्ये चकमक ; ९ दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद

जम्मू काश्मीर (वृत्तसंस्था) भारतीय लष्कराने काश्मीरमधील विविध भागांमध्ये केलेल्या गेल्या २४ तासांत केलेल्या कारवाईत ९ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. दरम्यान, या कारवाईत एक जवान शहीद झाला असून इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

 

या चकमकीत बाटपुरा येथे शनिवारी ४ दहशवादी मारले गेले. तर इतर ५ दहशतवादी नियंत्रण रेषेवरील केरन सेक्टरमध्ये ठार झाले आहेत. केरन सेक्टरमध्ये ठार झालेले दहशतवादी भारताच्या हद्दीत घुसण्याच्या प्रयत्नात होते. या कारवाईत भारताचा १ जवान शहीद झाला आहे. तर इतर दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत.

Protected Content