उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या भुसावळात प्रचार सभा !

भुसावळ लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । रावेर लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या भाजपचे उमेदवार खा. रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ उद्या मंगळवार ७ मे रोजी सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भुसावळ शहरातील श्री मातृभूमी चौकात सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

रावेर लोकसभा निवडणुकीत महायुतीचे भाजपचे उमेदवार खा. रक्षाताई खडसे यांच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आले आहे. या अनुषंगाने भुसावळ शहरातील श्री मातृभूमी चौकात मंगळवारी साथ मे रोजी सायंकाळी प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेत्यांची उपस्थिती लाभणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमुळे उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारासाठी बुस्टर डोस ठरणार आहे.

भुसावळ विचारात सभा होत असल्याकारणामुळे आज सायंकाळी भुसावळचे आ. संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सभेचे आयोजन करण्यात आला असून कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.

या सभेला मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील, आ. राजूमामा भोळे, आ. मंगेश चव्हाण, आ. चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर महायुतीचे नेते व पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे.

Protected Content