


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर जिल्हा पदवीधर प्रकोष्ठाच्या सरचिटणीसपदी विशाल पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल पक्ष संघटन व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा विशेष सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. पक्षाच्या ध्येयधोरणांचा प्रसार आणि पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी पवार यांनी नेहमीच पुढाकार घेतला असून त्यांच्या या कार्याची दखल घेत ही नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, पदवीधर प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष शिरीषकुमार तायडे यांच्यासह महानगर क्षेत्रातील सर्व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी विशाल पवार यांना नियुक्ती पत्र सोपवत पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. विशाल पवार यांनी पक्षश्रेष्ठींनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत संघटन बळकट करण्यासाठी आणि तरुणांना पक्षाशी जोडण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
जळगाव भाजप पदवीधर प्रकोष्ठ सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल विशाल पवार यांचा आमदार राजूमामा भोळे, दीपक सूर्यवंशी व शिरीषकुमार तायडे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.



