आईने मुलाला नदीत फेकले; मगरीच्या जबडयात आढळला अर्धा मृतदेह

बंगळूरू-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कन्नड जिल्हयामधील दांडोल तालूक्यातील हलामदी गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे सावित्री नावाच्या महिलेचा आपला पतीन रवीकुमार यांच्याशी वाद झाला होता. त्यांच्या वादाचे कारण त्यांचा ६ वर्षाचा मुलगा विनोद होता. तो दिव्यांग असल्यामुळे त्यांला सामान्य मुलांसारखे बोलता येत नाही.
या वादातून सावित्रीने विनोदला ४ मे रोजी शनिवारी रात्री एका नदीत फेकून दिले. तिचे हे कृत लक्षात येताच मुलाला शोधण्यासाठी शोध मोहिम राबवण्यात आली. या नदीत मगरी आहे. त्यात ५ मे रोजी रविवारी मुलाचा अर्धवट मृतदेह एका मगरीच्या जबडयात आढळून आला. या मुलाचा अर्ध शरीर मगरीने खाल्ला होता. पोलिसांनी महिलेवर हत्येचा गुन्हा दाखल करत तिला व तिच्या पतीला अटक केली आहे.

Protected Content