भादली शिवारातून एअरटेल टॉवरच्या साहित्याची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक येथील शेतातील एअरटेल टॉवर कंपनीचे ५ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक गावातील विलास हरी महाजन यांच्या शेतात एअरटेल कंपनीचे टॉवर बसविण्यात आले आहे. मंगळवारी २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या अज्ञात चोरट्याने ५ हजार रुपये किमतीचे टॉवरचे साहित्य चोरून नेले.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर एअरटेल टॉवर कंपनीचे सुरक्षा अधिकारी रवींद्र अरविंद पाटील रा. जळगाव यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार शुक्रवारी २३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव हे करीत आहे.

Protected Content