जेडीसीसी बँक परिसरातून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील जेडीसीसी बँकेच्या परिसरातून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चुडामण शंकर भारंबे वय ५५ रा. चिनावल ता. रावेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. बुधवारी २१ फेब्रुवारी रोजी ते कामाच्या निमित्ताने त्यांच्या दुचाकी (एमएच १९ डीजी ८४७३) ने जळगाव शहरातील जेडीसीसी बॅक परिसरात आलेले होते. त्यावेळी त्यांनी दुचाकीपार्कीगला लावलेली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेल्याचे दुपारी १२ वाजता उघडकीला आले. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी मिळून आली नाही. अखेर त्यांनी शुक्रवारी २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक कमलेश पवार हे करीत आहे.

Protected Content