Theft : अज्ञात चोरट्याने लंपास केला; साठ हजाराचा अल्युमिनियम तार

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील सडावण शिवारातून डि.टी.सी.वरील एल.टी.लाईन साहित्य चोरीला गेल्याची घटनां घडली आहे. यात चोरट्याने सुंदरपट्टी शिवारातील एकूण साठ हजार एकशे चौपन्न रुपयाची अल्युमिनियम तार लंपास केली आहे.

याविषयी अमळनेर ग्रामीणचे सहा, अभियंता विजय माधवराव माकी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय विदयुत अधिनियम सुधारणा कलमानुसार कायदेशीर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याविषयी अधिक माहिती अशी कि, ‘सोमवार, दि.18 फेब्रुवारी 2022 रोजी सडावण शिवार येथील डि.टी.सी.वरील एल.टी.लाईन साहित्य चोरीस गेलेले माहीत पडले. त्यानुसार वरिष्ठ तंतज्ञ, अविनाश अशोक रणदिवे यांना फोनवरुन माहिती देत सहा, अभियंता विजय माधवराव माकी हे सह. कर्मचारी प्रविण प्रल्हाद पाटील (प्रधान तंतज्ञ) यांच्यासह घटनास्थळी पोहोचले.

सडावण शिवार व सुंदरपट्टी शिवारातील डि.टी.सी.क्र. लिलाबाई भिल यांच्या शेतातील 21,722 रुपये, महादु दगडु सोनार 8,355/- रुपये आणि अंनत नथ्थु पाटील यांच्या शेताच्या बांधावरील 30,077 रुपयांचा असा म्हणजेच म.रा.वि.वि.कंपनी मर्यादित यांचा एकूण 60,154 रुपयांचा एक लघुदाब वाहिनीच्या दुस-या पोलपासून बी –फेसचा अल्युमिनियमचा तार (एल.टी.लाईन साहित्य) चोरीस गेल्याचे दिसून आले.

म.रा.वि.वि.कंपनी मर्यादित यांचा अल्युमिनियमचा तार कोणीतरी अज्ञात चोट्याने स्वतःच्या फाद्यासाठी चोरुन नेला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.”

 

Protected Content