Emergency meeting : भोंगा प्रकरणावरून पोलीस प्रशासनाने घेतली सर्वधर्मीय विश्वस्तांची बैठक

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सध्या राज्यभर गाजत असलेल्या  धार्मिक स्थळावरील भोंगा प्रकरणावरून येथील पोलीस ठाण्याचे वतीने आज गुरुवारी रोजी सकाळी शहरातील सर्व मस्जिद व मंदिर विश्वस्तांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावल येथील पोलीस ठाण्याच्या आवारात आज संपन्न झालेल्या बैठकीप्रसंगी उपस्थितीत मज्जिद आणी मंदीरांच्या विश्व्स्थांना भोंग्या संदर्भातील कायदा सुव्यवस्थेवरून उपस्थितीत होणाऱ्या प्रश्नावरून मार्गदर्शन करतांना येथील पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांनी सांगितले की, “राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार मस्जिद व मंदिर यावर लावण्यात आलेले लावूड स्पीकर विनापरवानगीने वाजवता येणार नाही. त्यासाठी पोलीसांकडून रीतसर परवानगी घ्यावी लागेल. तसेच रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत कोणत्याही धार्मिक अथवा कोणत्याही कारणास्तव लाऊडस्पीकर वाजवता येणार नाही. असे आढळल्यास त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात येईल.”

या बैठकीत शांतता समितीचे जेष्ठ सदस्य हाजी शब्बीर खान मोहम्मद खान यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थितांनी उपस्थित केलेल्या शंकांचे सहाय्यक पोलीस अधिक्षक आतिश कांबळे यांनी निरसन केले. बैठकीस शहरातील सर्व मस्जिद व मंदिराचे विश्वस्त बैठकीस उपस्थित होते.

Protected Content