पाचोऱ्यातील श्री स्वामी समर्थ केंद्रात अखंड नाम जप यज्ञ सप्ताहास प्रारंभ

पाचोरा – नंदू शेलकर | शहरातील संघवी काॅलनी स्थित दिंडोरी प्रणित श्री. स्वामी समर्थ आध्यात्मिक व बाल संस्कार केंद्रात श्री दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे.

 

आज गुरुवार  १ डिसेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरासह ग्रामीण भागातील ५०५ भाविकांनी या सप्ताहात आपला सहभाग नोंदविला आहे. सलग आठ दिवस चालणाऱ्या अखंड नाम जप यज्ञ सप्ताहात दररोज ८ वाजता नियमित भुपाळी आरती, ८ वाजुन १० मिनिटे ते १०:३० वाजेपर्यंत सामुहिक श्री. गुरुचरित्र वाचन, साडेदहा वाजता नैवेद्य आरती, साडेदहा ते १२ वाजेपर्यंत विविध प्रकारचे याग, सायंकाळी ५ ते साडेसहा वाजेपर्यंत पालखी सोहळा व औदुंबर प्रदक्षिणा, साडेसहा वाजता नैवेद्य आरतीनंतर मार्गदर्शन व विष्णु सहस्त्रनामाचे सामुहिक वाचन सेवा घेतली जाणार आहे. हा अखंड नाम जप यज्ञ सप्ताह यशस्वीतेसाठी केंद्र प्रतिनिधी गोकुळ पाटील, राम जळतकर, डी. पी. वाणी, संजय पाटील, सुभाष पाटील, बी. जे. पाटील, पी. के. सिनकर, नरेश गर्गे, सुवर्णसिंग राजपुत, गणेश वाणी, संदिप पाटील,  सुभाष पाटील, नंदा मिस्तरी, हर्षल चित्ते, चेतन पवार, गजेंद्र चौधरी, रेखा पाटील, पी. के. शिंदे, तेजस पाटील, जितेंद्र देवरे, जगन्नाथ सोनवणे, गणेश कापुरे, सार्थक वाणी, योगेश पाटील, बी. एस. पाटील यांचेसह अन्य सेवेकरी अहोरात्र सेवा देत आहेत.

Protected Content