जुन्या भांडणाच्या कारणावरून तिक्ष्ण हत्याराने वार

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मागील भांडणाच्या कारणावरून ऑईसक्रीम विक्रेत्याला मारहाण तर त्यांच्या मुलावर तीक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, रामलाल दलीचंद पुरभिया (वय-४५) रा. रौनक कॉलनी, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. आईस्क्रीमची गाडी लावून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या कामात त्यांचा मुलगा गोविंद पुरभिया मदत करतो. बुधवारी २० एप्रिल रोजी रामलाल यांनी त्यांची गाडी अजिंठा हाऊसींगच्या गेटजवळ लावलेली होती. दरम्यान मागील भांडणाच्या कारणावरून गणेश भगवान लोहार रा. म्हाडा कॉलनी जळगाव आणि रोहित शिंदे रा.हनुमान नगर यांनी रामलाल यांनी बेदम मारहाण केली तर त्याचा मुलगा गोविंद याच्या हातावर तिक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर दुखापत केली. जखमीस जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी रात्री उशीरा रामलाल पुरभिया यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गणेश लोहार आणि रोहित शिंदे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राजपूत करीत आहे.

Protected Content