जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बिबा पार्क परिसरात दोन ठिकाणी घराच्या खिडकीतून तीन मोबाईल, इअरबर्ड ब्ल्युट्यूथ आणि पाकीट असा एकुण ३२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मंगळवारी २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी २३ ऑक्टोबर रोजी रात्री १ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, किरण विजय पाटील वय ४० रा. बिबा पार्क जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. २१ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता ते जेवण करून कुटुंबासह घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने घराची खिडकीतून हात घालत दोन मोबाईल आणि पार्कीट तर शेजारी राहणारे लोकेश विनोद पवार यांच्या घरातून १ मोबाईल आणि ईअरबर्ड ब्ल्युट्यूथ असा एकुण ३२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना मंगळवारी २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता समोर आली. त्याबाबत किरण पाटील यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ धनराज पाटील हे करीत आहे.