जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगरातून दुकानदाराची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना शुक्रवारी ११ डिसेंबर दुपारी उघडकीला आली. याप्रकरणी आज रविवार १३ डिसेंबर रोजी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, सुरेश रमेश पवार (वय-३८) रा. सावखेडा बु ता.जि. जळगाव यांचे शिवाजी नगरात भांडे घासण्याचे सामानांचे किरकोळ विक्रीचे दुकान आहे. दुकानावर जाण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ सीएच ५५६३) क्रमांकाची दुचाकी आहे. ११ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे शिवाजी नगरातील राधाकृष्ण नगरात असलेल्या दुकानावर गेले. शेजारी असलेल्या मोकळ्या जागेवर त्यांनी आपली दुचाकी लावली. व दुकानावर निघून गेले. दुपारी ३ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. दोन दिवस त्यांनी सर्व परिसरात शोध घेतला असता दुचाकी मिळून आली नाही. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश पाटील करीत आहे.