जळगाव येथील माहेरवाशीनीचा 6 लाखासाठी छळ; गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रिंगरोड परिसरात माहेरी राहणाऱ्या २४ वर्षीय विवाहितेला भडगाव येथील सासरच्या मंडळींनी ६ लाख रूपयांसाठी मानसिक व शारिरीक छळ करणाऱ्या पतीसह सहा जणांवर रविवार १३ डिसेंबर रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

अधिक माहिती अशी की, शहरातील रिंगरोड परिसरात माहेर असलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेचे सासर भडगाव येथील आहे. लग्न झाल्यापासून सुरूवातीचे काही दिवस चांगले गेले. त्यानंतर पती देवाजी शिवाजी पाटील यांना सतत टोमणे मारणे सुरू केली. तसेच सासु कौशल्याबाई शिवाजी पाटील, सासरे शिवाजी शहादू पाटील रा. भडगाव, नणंद प्रतिभा अनिल पाटील, नांदाई अनिल राघो पाटील रा. रा. अमळनेर, नणंद जया ज्ञानेश्वर पाटील आणि नंदोई ज्ञानेश्वर नामदेव पाटील दोन्ही रा. कासोदा ता.एरंडोल यांनी यांनी संगनमत करून विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ करण्यास सुरूवात केली. दरम्यान, घरासाठी ६ लाख रूपये माहेरहून घेवून यावे यासाठी विवाहितेच्या अंगावरील दागीने काढून घेतले. मानसिक छळ असहाय्य झाल्याने विवाहिता जळगाव येथे राहत असलेल्या आईवडीलांकडे राहण्यासाठी आल्या. आईवडीलांना ही हकीकत सांगितल्यानंतर जिल्हा पेठ गाठून पती देवाजी पाटील यांच्यासह सासरकडील सहा जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक निलेश पाटील करीत आहे.

 

Protected Content