जळगावाच्या काव्यरत्नावली चौकात कारने घेतला अचानक पेट (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । रस्त्यावर अचानक कार थांबल्याने सुरू करतांना गाडीत शॉर्टसर्किट झाल्याने कारने अचानक पेट घेतल्याची घटना दुपारी ४ वाजेच्या सुमारास काव्यरत्नावली चौकात घडली. यावेळी अग्नीशमन बंबाच्या मदतीने कारला लागलेली आग विझविण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, शहरातील काव्यरत्नावली चौकात अचानक कार (क्रं.एमएच-१७ एजे ३०६९) बंद पडली होती. कार चालक योगेश शिंदे यांनी बंद पडलेली कार सुरू करण्याच्या प्रयत्ना असतांना कारने अचानक पेट घेतला. कारने आग घेतल्याने तरूणाने तत्काळ कारच्या खाली उतरवून अग्नीशमन बंबाशी संपर्क साधला. महाबळ येथील भाऊंचे उद्यानजवळ उभी असलेली अग्नीशमन बंबाने धाव घेत ही आग विझविण्यात आली.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/219214189487112/

Protected Content