मु.जे.महाविद्यालयात ‘ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा प्रभाव’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मुळजी जेठा महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी ग्रामीण साहित्यावरील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा प्रभाव या विषयावर आज ऑनलाईन व्याख्यान घेण्यात आले. यावेळी मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. केशव सखाराम देशमुख यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सं.ना. भारंबे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. विद्या पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.योगेश महाले आभार प्रा. गोपीचंद धनगर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी भाषा प्रशाळा संचालक डॉ. भूपेंद्र केसूर आणि इतर प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. देशमुख पुढे  म्हणाले की, महात्मा ज्योतीराव फुले यांनी संबंध आयुष्यभर नव्या युगाची प्रभात सुरु करणारे लेखन केले. स्त्रियांचे प्रश्न, शेतकरी समस्या, शिक्षण आणि  सर्वसामान्य माणूस हा त्यांच्या लेखनाचा विषय होता. त्यांनी केलेली मांडणी सत्यान्वेषी होती. म्हणूनच महात्मा फुले यांचे लेखन हे सामाजिक परिवर्तनाचे हत्यार आहे. महात्मा फुले यांनी ‘आधी केले मग सांगितले’ या भूमिकेतून काम केले. ग्रामीण माणसाच्या भाकरीचे प्रश्न सोडविण्यासाठी ते आयुष्यभर कार्यरत राहिले. त्यांचे लेखन आणि त्यांनी चालविलेली चळवळ समजून घेतले तरच आपल्याला ग्रामीण साहित्य लेखन अधिक प्रभावीपणे करता येईल असेही ते म्हणाले.

 

Protected Content